कारची दुचाकीला धडक, दुचाकी चालक जागीच ठार

(अभय बेदमोहता)प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे-सेलू: नागपूरकडून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी चालक रोडवर पडून जागीच ठार झाला. राजू देवतारे (वय ५०) रा. पवनार असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी २० नोव्हेंबर दुपारी २ वाजताच सुमारास वर्धा नागपूर महामार्गावर केळझरजवळ घडली. धडक देणारी कार पळून गेली असता त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले.

मृतक राजू देवतारे हे एम एच ३२ एडब्ल्यू ०८०३ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने नागपूर येथून येत होते. दरम्यान केळझर शिवारात नर्सिंग कॉलेजजवळ नागपूर कडून भरधाव येणाऱ्या एमएच ३२ एक्स ३३९७ कारने त्यांना मागून जबर धडक दिली.

त्यात ते दुचाकी घेऊन रोडवर पडले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर कार चालक वाहन घेऊन पळाला. तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला देहगाव रोडवर ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्या मदतीने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघाताची सेलू पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *