जीनियस चॅम्प्सच्या विद्यार्थ्यांची अबॅकस स्पर्धेत चमकदार कामगिरी

हिंगणघाट : जीनियस चॅम्प्स अकॅडमीतर्फे आयोजित अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धा २०२६ तसेच राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. माधुरी विहीरकर कार्यकारी अध्यक्षा आधार फाउंडेशन तर प्रमुख अतिथी सौ. संगिता गडवार मॅडम होत्या अकॅडमीच्या संचालिका सौ. ज्योती धार्मिक यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राज्यस्तरीय स्पर्धेत चेताक्षी मनवर हिने ६० पैकी ६० गुण मिळवत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत लाव्या अतुल पारखेडकर हिने ९४ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. पाखी अतुल वांदिले व नीलेश्री भोयर यांनीही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. तसेच अधिरा मून, शारी धोते, हिमांशी वाणी, काव्या धात्रक, मृणमयी सिरसे, निधी दादगाये व विहांश बोकडे यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व गौरवचिन्हे देऊन सम्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत सौ. माधुरी विहीरकर व्यक्त करताना ‘अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यासोबतच त्यांची एकाग्रता, अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. विद्यार्थ्यानी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. त्यांच्या यशामागे पालकांचे सहकार्य तसेच ज्योती धार्मिक यांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. विद्यार्थी यांनी याशाहीतून प्रेरणा घेऊन भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या पालकांसह अकॅडमीचे नाव उज्ज्वल करावे,’ असे प्रतिपादन व्यक्त केले.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन मयुरी देशमुख यांनी केले, तर आभार अनुश्री कोपरे यांनी मानले. विद्यार्थ्याच्या यशामागे त्यांची मेहनत, सराव, पालकांचे सहकार्य आणि अकॅडमीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *