प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे-वर्धा – इंदिराराजीविरुद्ध गाजवणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई व भारताच्या माजी पंतप्रधान, प्रियदर्शिनी, भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्य आज सकाळी १०.३० वा. दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ बुधवारला जिल्हा मुख्यालय, इंदिरा सद्भावना भवन, मगन संग्रहालयासमोर समोर, बैचलर रोड वर्धा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षश्री. मनोजभाऊ चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम उपस्थित सर्वांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनकार्यास उजाळा देण्यात आला. यानंतर राणी लक्ष्मीबाई, पोस्ट ऑफिस चौक व स्व. इंदिराजी गांधी यांच्या (स्व. इंदिरा गांधी चौक, नागपूर रोड) येथील पुतळ्याला माल्यार्पण करून उपस्थिततांनी राणी लक्ष्मीबाई व इंदिराजी गांधी अमर रहे या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला.
यावेळी प्रामुख्याने डॉ. अभ्युदयजी मेघे, सुधीरभाऊ पांगुळ, प्रफुल्लभाऊ नाखले, अक्रमजी पठाण, अविनाशजी उबाळे, विजयभाऊ नराजे, चंद्रशेखरभाऊ घोडे, अभिजितभाऊ चौधरी, ऋतुजाताई भोयर सह इतर सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.