ट्रकमध्ये अवैधिरीत्या वाहून नेणाऱ्या २३ गोवंशांची सुटका

हिंगणघाट – ट्रकमध्ये अवैधिरीत्या वाहून नेणाऱ्या २३ गोवंशांची सुटका करण्यात आली. बजरंग दलाची सतर्कतेने पोलिसांनी ट्रक पकडून ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे.

नागपूरकडून हैदराबादकडे गोवंश भरून जाणाऱ्या ट्रकांवर बजरंग दलाचे कार्यकर्ते रितिक खोडे यांना सूचना मिळताच त्यांनी या संबंधात येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या कलोडे चौक येथे नाकाबंदी केली. पोलिसांनी २३ गोवंश असलेल्या ट्रकसह जप्त केली. रविवारी १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोवंश व ट्रक असा ३९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी एम एच २९ बीड ५४२२ क्रमांकाच्या ट्रकची थांबवून तपासणी केली असता त्यांत २३ गोवंश आढळून आले.

पोलिसांच्या मदतीने बजरंग दलाचे रितिक खोडे, सोनू दाते, विशाल ढोबरे, पियुष मुतकुले, शिवम भोयर, सूरज, यश निखाडे यांनी गोवंशाला पिंपळगाव रोडवरील गौरक्षणमध्ये त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान ट्रकमालक इशाद उर्फ राजा अब्दुल सय्यद रा. कामठी हा घटनास्थळावरून पसार झाला. सदर पोलीस कारवाई पोलीस उपनिरीक्षक हरिर सोनकुसरे, जमादार मंगेश हेमके यांच्यासह त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *