
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना वैद्यकीय न्यायशास्त्र ,पोस्टमार्टम प्रक्रिया, विषविज्ञान आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा न्यायालयीन वापर याबाबत प्रत्यक्ष ज्ञान देणे हे होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. पी. एन. मुरके (प्राध्यापक), डॉ. इंद्रजीत खांडेकर (प्राध्यापक), डॉ. शिवाजी मंचणकर (ज्युनिअर रेसिडेंट), डॉ. आनंद किन्नाके (ज्युनिअर रेसिडेंट), डॉ. अतुल राज (ज्युनिअर रेसिडेंट) आणि डॉ. सूरज कुकडे
यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून फॉरेन्सिक पुरावे संकलन व विश्लेषण प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात डॉ. दिवाकर प्रधान ( फॉरेन्सिक मेडिसिन विभाग) आणि डॉ. प्रा. शिप्रा सिंगम (यशवंत महाविद्यालय, कायदा विभाग) यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. सतीश शिंगारे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि फॉरेन्सिक विज्ञानाच्या कायदेशीर अंगाबाबत अनेक प्रश्न विचारून चर्चेत सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे कायदा विद्यार्थ्यांना वैद्यकीय पुराव्यांचे महत्त्व व न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचा वापर याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हा कार्यक्रम फॉरेन्सिक मेडिसिन व टॉक्सिकॉलॉजी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.