शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी प्रस्तावित मूरीघाटच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील शेतक-यांच्या विविध मागण्या व समस्या पालकमंत्र्यांनी डॉ. पंकज भोयर यांच्यासमोर मांडल्या व मागण्यांवर सहानभूतीपूर्वक विचार करून शेतक-यांना योग्य मोबदला मिळवून आणि त्यांना सर्वतोपरी मदतसुख मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी डॉ. पंकज भोयर यांनी शेतक-यांना दिले.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत कालवा लिंक-१ साठी पूर्ववेधनाची प्रक्रिया प्रस्तावित असून, सेलू तालुक्यातील झिलपी, बोरगाव, जाखाळा, बोरगांव आणि पिंपेळी येथील शेतक-यांचे कालडंमशीत सामायिक निवेदनात केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांची वांझिता होणार असून, रोजगार अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता शेतकरी-यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणी
निवेदनानुसार, संबंधित गावांमधील बहुतांश जमीन काळी, कसदार आणि सुपीक असून, या जमिनीवर कापूस, ऊस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग, मूग तसेच इतर हंगामी पिकांचे उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेती हाच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. अशा परिस्थितीत प्रकल्पासाठी जमीन संपादित झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा योग्य विचार करून त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि बाधितांना नियमानुसार योग्य मोबदला मिळावा, यासाठी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका त्यांनी मांडली.