परिस्थिती कितीही विपरीत असली तरी बालकांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी समर्पित भावनेने काम करणे हेच खरे पुण्याचे काम : भाऊ चासकर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विभागीय कार्यशाळा थाटात संपन्न. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले उद्घाटन.

प्रतिनिधी/दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : शिक्षणातील स्थैर्य हरवल्यामुळे आणि शिक्षकांना शिक्षणेतर कामात गुंतवून ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय आणि अनुदानित शाळमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तपासणी होते. ती झालीच पाहिजे, भरमसाठ फी घेणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कधीच गुणवत्ता तपासणी होत नाही? एकांगी विचार करून प्राथमिक शिक्षकांचे प्रतिमाभंजन सुरु आहे,

सतत ऑनलाइन, ऑफलाइन कामात गुंतवून ठेवताना शिक्षकांची पुरेशी संख्या नसणे, शिक्षकांना सातत्याने महिनानोंदी बीएलओ म्हणून काम देणे आणि संच मान्यतेच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षकांची पदे कमी केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शिक्षक संघटनांसह चर्चा केली पाहिजे.? सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळांच्या इमारती, शौचालयांचे संरचनात्मक ऑडीट करून आवश्यक भौतिक सुविधांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली पाहिजे,? शिक्षकांना शिकण्यासाठी पुरेशी वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण विषयक ज्येष्ठ अभ्यासक भाऊ चासकर यांनी केले आहे.?

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत ‘शिक्षण : काल, आज आणि उद्या’ या विषयावर उपस्थित समिती पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नागपूर विभागाची कार्यशाळा आणि राज्यातील सर्व विभागाच्या कार्यशाळेनंतर समारोपीय कार्यशाळा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी देशमुख लॉन्स, वर्धा येथील संपन्न झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे गृह, गृहनिर्माण, खनीकर्म, सहकार व शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांनी केले.

राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. संचमान्यता धोरणात व शिक्षक अभियोग्यता परीक्षबाबत अनुकूल असल्याचे स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते. राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी संचमान्यता, मुख्यालय, टीईटी परीक्षा, शिक्षण सेवकांचे मानधन, स्वयंपाकी मानधन, विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा या संबंधाने असलेल्या अडचणी विशद करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शिक्षकाकडील अशैक्षणिक कामे काढून घेण्याची मागणी राज्यमंत्री ना. भोयर यांच्याकडे यावेळी केली. राज्य नेते उदय शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.? शिक्षकांच्या सेवाशर्ती, रजा नियम यावर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी मार्गदर्शन केले.

वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन व, सेवा पुस्तकातील नोंदी या विषयावर वरिष्ठ लेखा सहाय्यक आमपाल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदे द्वारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेल्या वैशाली उरकाडे, उषा तळवेकर, रमेश हजारे, संजय मुंदाने, सुंदरसिंग साकोळे, चंद्रशेखर वैद्य, अनिल नाईक यांचे सह उत्कृष्ट रंगोली कलाकार अनिल खंगार, शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत यशस्वी विद्यार्थी घडविणारे हिंगणघाट येथील शिक्षक गणेश नवघे यांना सन्मानित करण्यात आले.

नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया, भंडारा चंद्रपूर जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक शिक्षक पदाधिकारी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत (सोलापूर), विलास कांटेकुुरे (धाराशिव), राज्य सरचिटणीस राजून कोरगावकर (सिंधुदुर्ग), राज्य कार्याध्यक्ष सखाजी पाटील (सांगली), राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर (पुणे), राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर (अमरावती), महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे (कोल्हापूर), राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील (रायगड), नगरपालिका महानगरपालिका आघाडी प्रमुख सुधाकर सावंत (कोल्हापूर), सातारा जिल्हा शाखेचे अध्यक्ष किरण यादव, सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अमोगसिद्ध कोळी, सातारा शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष विशाल कणसे, नागपूर विभाग प्रमुख किशोर डोंगरवार (गोंदिया), कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तींदकर, चक्रव्यूह आणि लोकनायक पुस्तकाचे लेखक शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार (सोलापूर), सिंधुदुर्ग चे सचिन मडνε, धाराशिव चे शिवाजी कवळे आदींसह नागपूर विभागातील सर्व जिल्हा, तालुका शाखाचे पदाधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रास्ताविक नागपूर विभाग उपप्रमुख अजय मोरे यांनी केले. संचालन वर्धा जिल्हा समाज माध्यम प्रभारी पवन बानेकर यांनी केले. वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे यांचे नेतृत्वात रामदास खेकारे, प्रशांत निंभारकर, श्रीकांत केंद्रे, श्रीकांत आहेराव, सुधीर सप्ते, राजेश महाबुधे, विनीत अहाके, वैशाली देशमुख, स्मिता गेडे, सुवर्णा आहेराव, महेश गाडगे, अनिल खंगार, रुपेश लुंगे, रामेश्वर भगत, अरुण राऊत, दीपंक शेकर, मनोज आस्वले, मनीष ठाकरे, नितीन डाबरे, प्रशांत लवले, गणेश येडम, अजय बोडखे व, प्रशांत दवंडे, शशीमोहन भुटे, प्रदीप मसने आदींनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *