वृद्धाश्रमातील आई-बाबांसोबत दिवाळी; अपघातग्रस्त कुटुंबांनाही मदतीचा हात!

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत उपक्रम; महेश गुल्हाने यांनी जपली २५ वर्षांची सेवापरंपरा

प्रतिनिधि / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा : दिवाळीचा आनंद समाजातील गरजूंसोबत वाटून घेण्याच्या भावनेतून कृष्णगिरी परिवारचे प्रमुख महेश गुल्हाने व त्यांच्या मित्रपरिवाराने यंदाही सेवाभावी उपक्रम राबविला। सिंदी (मेघे) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आई-बाबांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना कपड़े, भेटवस्तू आणि भोजन देण्यात आले। यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते। कृष्णगिरी परिवारतर्फे गेल्या २५ वर्षांपासून वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली जात आहे। वृद्धांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम, आपुलकी आणि सहवास मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे। यावेळी वृद्धांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व गरजाही जाणून घेण्यात आल्या।

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात वर्ध्यातील सोमनाथे लेआउट येथील मातृशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या भाविकांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजलि अर्पण करून जखमी व प्रभावित कुटुंबांना कृष्णगिरी परिवारतर्फे भेटवस्तू आणि आर्थिक मदत देण्यात आली। यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी कृष्णगिरी परिवारच्या २५ वर्षांच्या सेवाकार्याचे कौतुक केले। दुष्काळाच्या परिस्थितीत गरजूंच्या मदтиसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले। वृद्धाश्रमातील आई-बाबांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर प्रेम आणि आपुलकीच्या सहवासाचीही गरज आहे। नागरिकांनी वाढदिवस व कौटुंबिक आनंदाचे क्षण वृद्धांसोबत साजरी करावेत, असे आवाहन महेश गुल्हाने यांनी केले। यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अतुल वांदिले, पुष्पमाला देशमुख, रेखा देशपांडे, स्नेहा आकरे, अजय बझुरकर यांच्यासह कृष्णगिरी परिवारचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *