वर्धा : जिल्ह्यातील व आर्वी तालुक्यातील सायखेडा हे गाव वर्धा व अमरावती या रस्त्याला जोडणाऱ्या परंतु वर्धा जिल्ह्यात असून सायखेडा व आजूबाजूच्या १० ते १५ गावातील लोकांना अमरावती जिल्ह्यात जाण्याकरिता मध्ये वर्धा नदी असल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा मारून अमरावती जिल्ह्यात जावे लागत होते.
वर्धा जिल्हा सीमेवर वर्धा नदी असल्याने व लगेचच अमरावती जिल्हा सीमा लागून असल्याने व सायखेडा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना बऱ्याच वेळी कामानिमित्ताने अमरावती जिल्ह्यात जावे लागते. परंतु जिल्हा सीमा जवळ असतांना केवळ जिल्हा सीमेवर असलेल्या वर्धा नदीवर पुल नसल्याने अमरावती जिल्ह्यात प्रवेश करतांना २० ते २५ कि.मी. फेरा मारावा लागतो. सायखेडा व आजूबाजूच्या १० ते १२ गावातील लोकांनी खासदार श्री. अमर काळे यांना भेटून ही सर्व अडचण त्यांना सांगितली व वर्धा नदीवर सायखेडा जवळ पुल बांधून देण्याबाबत विनंती केली.
सायखेडा व आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता खासदार अमर काळे यांनी चालू असलेल्या अर्थ संकल्पिय अधिवेशनाच्या कालावधीत महामार्ग व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची दि. ११.३.२०२६ रोजी दिल्ली येथे भेट घेऊन सायखेडा व आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना अमरावती जिल्ह्यात जाण्याकरिता तसेच अमरावती जिल्ह्यातील नदीकाठावरील गावातील लोकांना वर्धा जिल्ह्यात वर्धा नदी ओलांडून प्रवेश करता यावा या दृष्टीने सायखेडा त. आर्वी येथे वर्धा नदीवर पुल बांधकामाकरिता निधी मंजूर करून देण्याबाबत चर्चा करून पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून विनंती केली.
सायखेडा व वर्धा नदी काठावरील वर्धा व अमरावती जिल्ह्यातील गावातील लोकांची रहदारीची अडचण लक्षात घेता वर्धा नदीवर पुल बांधून देण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन गावकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेता पुलाच्या मंजूरीबाबत लगेचच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन खासदार अमर काळे यांना दिले. सायखेडा व आजूबाजूच्या गावातील वर्धा नदीकाठावरील गावकऱ्यांच्या अडचणीची तात्काळ दखल घेतल्याबद्दल गावकऱ्यांनी खासदार अमर काळे यांचे आभार मानले.