सेलू तालुक्यातील रायपुर जंगली येथील मृतदेह प्रकरणाचा उद्रेक

सहा दिवस उलटूनही अंत्यसंस्कार नाही

खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

सेलू : तालुक्यातील रायपुर (जंगली) येथे घडलेल्या दुर्दैवी घटनाला तब्बल सहा दिवस उलटून गेले तरीही मृत परिवाराला न्याय मिळालेला नाही. या तीव्र संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून, मृतदेह अद्यापही ग्रामीण रुग्णालय सेलू येथील मर्च्युरी कक्षातच पडून आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशील भूमिकेविरोधात ग्रामस्थांसह खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात थेट वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला आहे.

?या संपूर्ण गंभीर प्रकरणात प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घटनेच्या इतक्या दिवसा नंतर ही पीडित कुटुंबाची साधी भेट घेण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. यासाठी लोकप्रतिनिधी आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या या तोंडावर फेकून देणाऱ्या भूमिकेमुळे संतप्त गावकऱ्यांमधील रोष आता भडकला आहे.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आणि ग्रामस्थ हतबल झाले असतानाही प्रशासकीय यंत्रणेकडून साधे सांत्वनही केले जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करून न्याय दिला जात नाही, तोपर्यंत मृतदेहाचे अंतिम संस्कार करणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून त्यामुळे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावपूर्ण शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावाद्वराउद््रेकाची आणि रोषाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर असणार आहे असे मत तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केले या आंदोलनात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते तर दुपार नंतर राष्ट्रवादी चे नेते आमदार रोहित पवार सहभागी होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *