सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ हिंगणघाट येथे भव्य आंदोलन

हिंगणघाट : सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आज हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनामागील मागण्यांना पाठिंबा व्यक्त करत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तसेच शिक्षण व्यवस्थेतील गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तसेच लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा सन्मान राखून संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले.

यानांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला, कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर शासनाच्या वतीने संबंधित मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, या मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *