वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधानसभा निवडणूक
नामांकनाच्या शेवटच्या दिवशी गर्दी
वर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच गर्दी झाली. यावेळी काँग्रेसच्यावतीने शैलेश अग्रवाल, भाजपाच्यावतीने अरुण लखानी, अपक्ष उमेदवार म्हणून सुधिर कोठारी यांनी आपले नामांकन अर्ज सादर केले आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल याच्यासोबत काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी राज्यमंत्री रणजितदादा कांबळे, चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, उबाठाचे गटनेता संदीप गिरडे, राकाँ शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, विनायक बांगडे, युवा नेता शेखर शेंडे, आदी उपस्थित होते. तर भाजपाचे उमेदवार लखानी यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार भांगडिया, राजेश बकाने, चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार सह भाजपाचे नेता उपस्थित होते. भाजपाच्यावतीने अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे. तर काँग्रेसनेही दमदार उमेदवार शैलेश अग्रवाल यांना मैदानात उतरवल्याने सामना अटीतटीचा होईल. अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधिर कोठारी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.