पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिसांची धडक कार्यवाहीखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासांत केले जेरबंद
वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या इतवारा बाजार परिसरात एका गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत वर्धा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. इतवारा बाजार परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा गुन्हा पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे नोंद करण्यात आला आहे ही घटना इतवारा बाजार, वर्धा येथील रहिवासी फिर्यादी नागेश जानरावजी फुलझेले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे नोंदविण्यात आला असून पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक ६२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ही घटना दिनांक १८/०५/२०२६ रोजी रात्री ११:५० वाजताच्या सुमारास घडली असून, अवधूत फुलझेले (वय ३५ वर्षे, रा. फ्रुट मंडी, इतवारा बाजार, वर्धा) असे या घटनेतील मृताकाचे नाव आहे. या घटनेतील आरोपीला काही तासांत अटक गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वर्धा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी गोविंद गंगावणे वय ४२ वर्षे, रा. इतवारा बाजार, वर्धा याला पोलिस स्टेशन वर्धा शहरच्या पोलिसांनी आज दिनांक १९/०५/२०२६ रोजी पहाटे ०४:०२ वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहर डी. बी. पथकाने तपास करीत आहेत ही आरोपीला घेतले ताब्यात सदरची ही कार्यवाही सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा सदाशिव वाघमारे अप्पर पोलिस अधीक्षक वर्धा व उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशन वर्धा यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशन वर्धा शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद रास्कर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार इमरान खिल्लची बक्कल नंबर ९५५ पोलीस हवालदार थेमसिंग कोहचडे बक्कल नंबर ६०३ आणि पोलीस शिपाई विजय खाडे बक्कल नंबर ५६८ यांच्या पथकाने ही कार्यवाही सर्वात मोठी केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली आहे सदर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस वर्धा पोलिस करीत आहे.