प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : दरवर्षीप्रमाणे २३ मार्च २०२६ रोजी संपूर्ण देशात स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्त शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिवस, आयटक कामगार केंद्र वर्धा येथे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली तर विद्युत कर्मचारी फेडरेशनचे राजेश फाले यांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांना आयटक परिवार तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला मालर्पण करून व उपस्थितीतानी फुल वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव विजया पावडे यांनी आज सुद्धा भगतसिंग यांच्या विचारांची गरज आहे असे सांगितले. त्यापुढे म्हणाल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या शहिदानी आपल्या प्राणाची बाजी लावली इंग्रजांनी लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज केला व यात त्यांचा मृत्यू झाला या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश अधिकारी सांडर्सला गोळ्या घातल्या याप्रकरणी इंग्रजांनी भगतसिंग राजगुरू सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती ती फाशी २४ मार्च रोजी देण्याचा निर्णय झाला होता परंतु इंग्रजांनी २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी फाशी दिली.
देशासाठी बलिदान देणाऱ्या या क्रांतिकारकांना अभिवादन करते विविध उदाहरणे देऊन त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
माजी मंत्री माजी खासदार दत्ता भाऊ मेघे यांच्या मृत्यूची बातमी रात्रीची व्हाट्सअप वर समजली त्यांना आयटक परिवार तर्फे श्रद्धांजली अर्पण करत दत्ता मेघे साहेब यांनी हजारो मुलांना रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाला सुखी करण्याचे काम त्यांनी केले म्हणजे हजारोच्या घरच्या चुली पेटविण्यात मदत केली आरोग्य सेवा, शिक्षण उत्तमरीत्या दिली त्यामुळेच त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला, सर्वांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती ही आपलीशी करून गेली नागपूर येथे कामगार नेते ए.बी.वर्धन यांच्या अनेक कार्यक्रमात श्रोते म्हणून उपस्थिती लावली व जनतेत बसून कॉम्रेड वर्धन यांचे भाषण ऐकले मेघे साहेब यांनी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या सेवेबद्दल दोन्हीही जिल्ह्याचे नागरिक त्यांचे ऋणी आहेत असे विचार आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले.
राजेश फाले वंदना कोळणकर, मैना उईके, अलका भानसे अरुणा नागोसे माधुरी मुळे संगीता उरकुडे सुषमा ढोक रंजना वनिता फुलबांधे, इत्यादींनी विचार व्यक्त करून आपली श्रद्धांजली अर्पण केली.