वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीत गौडबंगाल

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सावळा गोंधळ असून शिल्लक जमा रकमेत तफावत असल्याची तक्रार संचालकांनी केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संचालक मंडळाची सभा दि. २५/०१/२०२६ ला आयोजित करण्यात आली होती. या सभे मध्ये माहे डिसेंबर २०२५ महिन्याच्या जमा-खर्च ठेवण्यात आला. जेव्हा आम्ही सचिव श्री समीर पेंडके यांना डिसेंबर २०२५ महिन्याच्या शेवटच्या शिल्लक रकमेचे विवरण मागितले ज्या विवरण मध्ये दोन गोष्टी असतात नगद स्वरूपात पैसे आणि बँकेच्या खात्या मध्ये असणारे पैसे, तेव्हा त्यांनी लेखापाल ला या विषयी विचारणा केली.

या वर लेखापाल याने १५ ते २० मिनिटं घेऊन त्याचा तपशील सभे पुढे ठेवला. या तपशीला मध्ये असे आढळून आले की सभे पुढे ठेवण्यात आलेली डिसेंबर २०२५ च्या अखेरीस शेवटची शिल्लक रक्कम रु. ४०,९१,२५७.३१/- दाखवलेली आहे परंतु खरोखर असणारी शेवटची शिल्लक रक्कम ही जवळपास रु. १५,००,०००/- इतकीच आहे. म्हणजे दाखवलेली रक्कम आणि खरोखर असणाऱ्या रकमे मध्ये अंदाजे रु. २५,००,०००/- ची तफावत आहे. यावर आम्ही बाजार समितीचे सचिव श्री समीर पेंडके यांना विचारणा केली असता त्यांनी ही तफावत आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून आहे असे आम्हाला सांगितले. यावर आम्ही खालील सही करणाऱ्या संचालकांनी आक्षेप घेत विचारणा केली की आम्ही एप्रिल २०२३ पासून या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आम्ही संचालक म्हणून या पदावर आहोत.

या रकमेतील तफावतीची बाब बाजार समितीच्या पहिल्याच सभे पुढे ठेवण्यात आली पाहिजे होती, तसेच वर्ष २०१२ ते वर्ष २०२३ या अकरा वर्षांच्या कालावधी मध्ये या रकमेच्या तफावतीची माहिती घेऊन बाजार समितीचे सचिव श्री समीर पेंडके यांनी दुरुस्ती करून घ्यायला हवी होती. या वर श्री समीर पेंडके यांनी या बाबतचे खापर स्टेट बँक ऑफ इंडिया वर्धा शाखा या बँक वर फोडले व आम्हाला उडवा उडवी चे उत्तर दिले आहे. माहे डिसेंबर २०२५ पर्यंत संचालक मंडळाला अंधारात ठेवून तफावत असलेली रकमेवर जमा-खर्च मंजुर करून घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ च्या संचालक मंडळाच्या सभे मध्ये जेव्हा आम्ही त्या महिन्या अखेरीस शिल्लक रक्कमेचा तपशील मागितला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जेव्हा आम्ही हा विषय धरून ठेवला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की स्टेट बँक ऑफ इंडिया वर्धा शाखा यांच्याशी संपर्क करून या रकमे मध्ये दुरुस्ती करू, परंतु आजच्या तारखे पर्यंत ती दुरुस्ती करण्यात आली नसून आम्हाला आपल्याकडे तक्रार करण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकरणां मध्ये संचालक मंडळाच्या पहिल्या मीटिंग पासून संचालक मंडळाला अंधारात ठेवून जमा-खर्चा वरची तफावत रक्कम दाखवून आमची मंजुरी घेण्यात आली आहे असे आमचे म्हणणे.

हे प्रकरण म्हणजे वर्धा बाजार समिती चे सचिव व सभापती यांचा निष्काळजी पणा म्हणावा की भ्रष्टाचार म्हणावा हे आपण चौकशी करून आमच्या निदर्शनात आणावे अन्यथा आम्ही आंदोलनाचा पवित्रा वापरू, आपणास या पत्राद्वारे आम्ही विनंती करतो की आपल्या स्तरावर याची चौकशी करून सत्य आमच्या समोर आणावे व संचालक मंडळाला अंधारात ठेवून जो आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे त्यावर निबंध आणावे, अशी तक्रार सहकारमंत्री, पणन व राजशिष्टाचारमंत्री, सहकारी आयुक्त, निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे डॉ. संदिप देशमुख, पवन गोडे, वैशाली उमाटे, दिनेश गायकवाड, रमेश मोंढे, साहेबराव भोयर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *