मयुरा अमर काळे महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड-२०२५ ने सन्मानीत सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचे हस्ते पुरस्कार देऊन केला सन्मान

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : मयुरा अमर काळे ह्यांना औद्योगीक क्षेत्रातील त्या करीत असलेल्या कार्याचा व त्यांनी गृहीणी म्हणून सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपला स्वतःचा उद्योग टाकून त्यातही त्यांनी आपली कार्यकुशलतेच्या भरवश्यावर एक सफल उद्योजिका म्हणून आपल्या उद्योगाला जे नावारुपास आणले. आधार उद्योगाच्या माध्यमातून धरा अमृत या नावाने लाकडी घाण्यावर तेल उत्पादन सुरु झाले व हे तेलाची गुणवत्ता व शुद्धता या भरवश्यावर लगेचच हे उत्पादन नावारुपास येऊन याची महाराष्ट्र राज्य स्तरावर दखल घेऊन त्यांच्या उद्योगाला महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड-२०२५ पुरस्काराकरीता निवड करण्यात आली.

हा पुरस्कार सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचे हस्ते मयुरा अमर काळे यांना देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोबतच या आनंदाच्या प्रसंगी अजिंक्य अमर काळे हा सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होता.

सौ. मयुरा अमर काळे पुर्वाश्रमीच्या मयुरा अशोक शिंदे आजोबा स्व. अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्री, वडील श्री. अशोकराव शिंदे कृषी क्रांतीचे जनक तर भाऊ अॅड. सिद्धार्थ शिंदे असा वारसा लाभलेल्या मयुराताई सर्वच घराणे आधुनिक व प्रगल्भ विचारसरणीचे स्त्री जर स्वंयपुर्ण झाली तर समाजाचा कणा मजबूत होतो हा संपुर्ण शिंदे घराण्याची विचारसरणी व हाच वारसा घेऊन मयुराताईंची वाटचाल सुरु झाली.

सन २००३ मध्ये मयुराताई विद्यमान खासदार अमर काळे यांचेची विवाहबध्द झाल्या. स्व. शरदराव काळे यांचा समृद्ध राजकीय-सामाजिक वारसा, व स्वार्थासाठी कुठलाही आपल्या स्वाभीमानाशी तडजोड न करण्याचा डॉक्टर साहेबांचा स्वभाव व तेवढ्याच मनमिळावू स्वभावाने वागणाऱ्या आई अनुराधा काकूंचा वारसा लाभलेले अमरभाऊ जिल्ह्यातील एक प्रगल्भ मनमिळावू व मितभाषी व्यक्तीमत्व व या जोडीला मयुराताई असा हा प्रीतीसंगम.

एवढे सर्व असूनही एक स्त्री म्हणून कौटूंबीक जबाबदारी कुशलतेने सांभाळून अमरबाबूच्या राजकारणात तेवढ्याच हिरीरीने सक्रीय सहभाग घेत पण मनात स्त्री म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धडपड व ह्यातूनच सन २००६ मध्ये निर्मिती झाली ते ‘आधार उद्योगाची’ ह्यात अनेक अडचणी आल्यात यश-अपयशाबरोबरच उद्योग क्षेत्रातील नवनविन आव्हाने पण स्त्री म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या ज्या ध्येयाने पछाडलेल्या मयुराताई त्या हार कशी मानणार. यात त्यांना स्व. अनुराधाताई काळे या सासू पण मयुराताईंना मिळणारा त्यांच्याकडून भरपूर पाठिंबा व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन इतकेच नाही तर खासदार अमरभाऊंचे राजकीय व्याप सांभाळून सतत मिळत असणारे मार्गदर्शन व पाठिंबा इतकेच नाहीतर माहेरचा प्रगल्भ विचारांचा वारसा व धडाडीचा स्वभाव यामुळे यश-अपयशाची तमा न बाळगता सतत पुढे जाण्याची धडपड करणाऱ्या मयुराताई एक छोट्याशा आधार उद्योगातून येथपर्यंत पोहोचल्या.

एकेक पायरी चढत आपल्या उद्योगाची प्रगती व त्यातही उत्पादनाच्या प्रतवारी कुठेही तडजोड न करता. आज जिल्ह्यात एक प्रसिद्ध उद्योजिका म्हणून नावारुपास आल्या. त्यांच्या उद्योगात होणारी उत्पादने देशपातळीवरच नाही तर बाहेर देशात सुद्धा मोठ्या आवडीने लोक खरेदी करून घेऊन जातात. यातच त्यांच्या सफलतेचे रहस्य आहे. मयुराताईंच्या या प्रवासात त्यांचे बंधू व प्रसिद्ध कायदेतज्ञ स्व. सिद्धार्थ शिंदे ह्यांचा नामोल्लेख करणेही तेवढेच आवश्यक आहे. एखादे छोटे अपयश आले की माणूस खचून जातो. पण अशा वेळी त्यांच्या पाठीशी सासरच्या मंडळीसोबतच खंबीरपणे उभे राहायचे ते त्यांचे बंधू सिध्दार्थ. ‘व्यवसायात टिकून राहायची जिद्द जर कुणाकडून मिळाली असेल तर ते ज्येष्ठ बंधू सिध्दार्थ शिंदे. आजही स्व. सिध्दार्थ शिंदे ह्यांचा साधा नामोल्लेख जरी झाला तरी त्यांचे डोळ्यात नकळत अश्रू तरळतात.

आज ‘धरा अमृत’ हे केवळ तेलाचे नाव राहिले नसून, ते शुद्धता आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. आपल्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार देऊन त्यांना सन्मानाने जगायला शिकवणे, हे मयुराताईंचे सर्वात मोठे यश आहे. आज जो पुरस्कार मयुराताईंना मिळाला आहे, तो केवळ त्यांच्या व्यवसायाचा सन्मान नाही, तर त्यांनी आजवर दाखवलेल्या सहनशीलतेचा, कष्टाचा आणि त्यांच्या धैर्याचा हा एक विनम्र गौरव आहे. मयुराताईंचा हा प्रवास येणाऱ्या पिढीतील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. अशा या कर्तृत्ववान स्त्री मयुराताईंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *