गावठी मोहा दारु भट्टीयांवर कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त सावंगी (मेघे) पोलिसांची कारवाई

वर्धा : गावठी मोहा दारू कारवाईमध्ये भट्ट्यांवर कारवाई करत आरोपीविरोधात ६ गुन्हे दाखल पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलिसांनी केली. सावंगी (मेघे) पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविली. या विशेष मोहीमे अंतर्गत, माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या पांढरकवडा, सावंगी (मेघे) शिवारातील बेडा परिसरात पोलिसांची पथके तयार करून गावठी मोहा दारूच्या भट्टयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तयार केलेली गावठी मोहा दारू, हजारो लिटर कच्चा मोहा सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे रसायन, भांडी आणि इतर साहित्य असा १५ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सी.ए. परीक्षणाकरिता सॅम्पल वेगळे काढून उर्वरित मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे.

सदर कारवाईमध्ये आरोपींविरोधात ६ गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यात ६ संदिपसिंग दुधानी, रा. बेडा, सावंगी (मेघे), ता. जि. वर्धा, भोलासिंग लालसिंग भादा, रा. बेडा, सावंगी (मेघे), सिमाकौर गुरविरसिंग खिच्ची, रा. बेडा, ता.जि. वर्धा, परिता मारवाडे, रा. पांढरकवडा, धनपाल मारवाडे, रा. पांढरकवडा, राजबिरसिंग रूपसिंग खिच्ची, रा. बेडा, ता. जि. वर्धा यावर कारवाई करण्यात आली. या संदर्भात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पंकज वाघोडे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल शिंदे, डोनेकर, दुधाने, विलास भेडे, खाडे, मून, भगत, पंचभाई, निखील, वैद्य, अमोल, अनुप, अंकुश, वैभव, श्याम, शुभांगी, पघाले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *