जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमआय’ सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या ‘महिमा’ उपक्रमातून युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

मुंबई : जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता, महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्याला आंतरराष्ट्रीय संधींची जोड देणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल स्किल्य मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य मानकात समन्वय साधण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील आयटीसी मौर्य येथे जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी, १५ संस्थापक संस्था, शासकीय प्रतिनिधी, राजकीय मुत्सद्दी, राज्य सरकारे आणि उद्योग क्षेत्रातील एकत्र आणणाऱ्या ‘ग्लोबल स्किल मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ (जीएसएमआय) ची १२ ऑक्टोबर रोजी औपचारिक स्थापना झाली.

यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, खासदार तथा संसदेच्या कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकासविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष सत्यपाल सिंग, पोलंडचे भारतातील राजदूत ॲडम बुराकोव्स्की, जर्मनीचे उच्चायुक्त वॉल्टर लिंडनर, इटलीच्या दूतावासाच्या उपप्रमुख अ‍ॅंजेलो रॅमो, ओडिशा शासनाचे मनिषा वर्मा, नीती आयोग, टीएससी डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा, स्वेडन कंपनीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित घाटिया, बोर्डरलेसचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार, ‘जीएसएमआय’ चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना, वैश्विक बिझनेसचे सहसंस्थापक बाल केसरी तसेच नॅशनल फाउंडेशनचे पदाधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याच्या बळावर परदेशात उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळण्यावर, महाराष्ट्रातील अगदी दुर्गम भागातील तरुण इंग्रजीसह कोणत्याही देशात करिअर घडविण्याचा आत्मविश्वास मिळवा यासाठी आवश्यक कौशल्य, आर्थिक सहाय्य आणि संसाधनांचे पाठबळ उपलब्ध झाले पाहिजे, जागतिक रोजगाराच्या संधी केवळ शहरी भागाच्या लोकसंख्येपुरत्या मर्यादित न राहता राज्यातील सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.

उद्घाटन सोहळ्यात ‘स्थानिक कौशल्य, जागतिक आकांक्षा’ या विषयावर चर्चा परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ‘जीएसएमआय’च्या लाँचचे स्वागत केले. ते म्हणाले की, भारत हा जागतिक कौशल्य गतिशीलतेकडे केवळ कामगारांचे स्थलांतर म्हणून न बघता, तरुणांना अनुभव मिळण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आणि भारताच्या विकासात योगदान देण्याची ही एक मोठी संधी आहे.

‘जीएसएमआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी जागतिक रोजगाराचे शाश्वत मार्ग तयार करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित केले. ते म्हणाले, ‘जीएसएमआय’मुळे जगभरात सोयीपेक्षा विश्वासार्हतेला आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाच्या समन्वयाला प्राथमिकता देण्याची संधी मिळाली आहे.

स्थानिक प्रतिभा, जागतिक आकांक्षा : भारतीय प्रतिभांना कौशल्य विकासासाठी सज्ज करणे या विषयावर पॅनेल चर्चा पार पडली. यामध्ये ओडिशा शासनाचे आयुक्त-सह-सचिव धुरेंद्र प्रियदर्शनी, टीएससी डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा आणि केएस कॉर्पचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित घाटिया यांनी सहभाग घेतला. बोर्डरलेसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. हरप्रित सिद्धू यांनी महाराष्ट्र शासन यात सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी भारतीय युवकांना जागतिक रोजगारासाठी तयार करताना कौशल्य विकास, उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षण, परदेशी ज्ञान, सांस्कृतिक समझ आणि रोजगारांनंतरचे सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

राज्यातील कौशल्य विकास व आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्रात नवा अध्याय- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग काम करत असून महाराष्ट्र हा उद्योग, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सातत्याने पुढाकार घेणारा राज्य आहे. ‘जीएसएमआय’ सहकार्यामुळे राज्यातील कौशल्याचा विकास च्यायला आणि आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्र विश्वात दुवा अधिक मजबूत होईल. युवकांच्या आकांक्षांनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक केवळ जागतिक रोजगाराचा फायदा घेणार नाहीत, तर आपल्या ज्ञानातून, अनुभवातून आणि कौशल्यातून देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देतील, असा विश्वास कौशल्य मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

‘महिमा’च्या माध्यमातून परदेशात रोजगाराच्या संधी: अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा

कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा या कार्यक्रमात म्हणाल्या, जागतिक स्तरावर मनुष्यबळाच्या गरजांना रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक देशांमधील मनुष्यबळाकरिता विशिष्ट मागणी ओळखून, स्थानिक जिल्हा स्तरावरील युवकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्योग भागीदार निमंत्रक बैठका, पाहणी बैठका आणि प्रशिक्षण क्षमतांमध्ये समन्वय साधला जात आहे. महाराष्ट्र शासनाने या उद्देशाने स्वतंत्र नवीन उपक्रमासाठी ‘महिमा’ (महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था) या विशेष संस्था ८ कंपन्यांची स्थापना केलेली आहे. परदेशातील रोजगाराच्या संधी सुलभ करणे आणि जागतिक कौशल्य गतिशीलतेला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्राच्या कौशल्य विकास परिषदेत १,००० हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १,८०० हून अधिक तांत्रिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे, जो जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ विकसित करण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *