मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच २६ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. १५८-जोगेश्वरी, १६७- विलेपार्ले व १६८ चांदिवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत विभागीय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासाठी निवडणूक कामकाज विषयक व ‘ईव्हीएम’ संदर्भातील प्रथम प्रशिक्षण मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले. १७३- चेंबूर आणि १६७विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड हे उपस्थित होते.
१६७- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास ६७२ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर २०६ जण गैरहजर होते अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.मतदान केंद्र अध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, व इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण यावेळी झाले. यावेळी हॅण्डस ऑन ट्रेनिंगची देखील व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनीदिली आहे.