प्रतिनिधी : दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : चन्नावर ई-विद्या मंदिर, येलाकेली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह २०२६-२७ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्याची सुरवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी जिया वर्मा, मनस्वी मानकर व रिया बुधववार यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इएचए (ईएचए इयत्ता दहावी) बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार. यामध्ये तनुश्री नायडे (मराठी १००/१००), श्रावणी देशमुख (९६.६९), पार्थ देशमुख (९६.२९), समर बंजारी (गणित १००/१००), तियंका गोरेकर (हिंदी १००/१००), अहाना झोडे (९२.४९), नितीश जैन (९२.२९), ऋषिता गुजरेकर (९१.४९), भावी भोंसकर (९१.४३), दिव्या काळे (९१.२९) आणि कलश मिश्रा (९०.४९) या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या पुढील वाटचालीसठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच छ्ळू कानपूर, छ्ळू धनबाद आणि छ्ळू पिलानी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अनुभव सांगताना सातत्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सोशल मीडियाचा योग्य वापर यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक आणि शाळेचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
याशिवाय इंग्रजी विषयात १००/१०० गुण मिळवणाऱ्या पूजा कपूर मॅडम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ईए) विषयासाठी अविनाश झुंजारकर सर आणि मराठी विषयासाठी वसुधा हिवरे मॅडम यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी चन्नावर सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप सौ. सरोज तिवारी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. राष्ट्रीय गी्ताने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘फेलिसिटेशन समारंभ २०२६-२७’ हा विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.