१४ दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न ??वर्धा : आजच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्व विकास शिबिराची समाजाला विशेषतः तरुण पिढीला नितांत गरज आहे. हे शिबिर केवळ व्यक्तिमत्व सुधारत नाही, तर जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद प्रदान करते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता रामनगर येथील सर्व सेवा संघाच्या मैदानात स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वार संचालित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित १४ दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्धा नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका वंदना भुते तर प्रमुख उपस्थितीत स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश इखार, उपाध्यक्ष मोहन मोहिते, सचिव तथा शिबिराचे मुख्य मार्गदर्शक शिहान मंगेश भोंगाडे, संस्था संचालक तथा गॅरंटी इंग्लिश स्पिकिंग चे संचालक श्याम पठवा, संस्था संचालक तथा विश्वसिंधी सेवा संगम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आऊजा, संस्था सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे, योग शिक्षिका हेमलता काळबांडे, ऊशू स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत, मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष सौ. मनीषा राऊत, डान्स व चित्रकलेचे प्रशिक्षक संदीप जोशी व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
समाजाला सकारात्मक हुशार आणि प्रगल्भ पिढी देण्यासाठी अशा शिबिराची गरज असल्याचे मत इमरान राही यांनी व्यक्त केले. तरुणांमधील भीती आणि संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, तरुणांमध्ये नेतृत्व आणि संघभावना रुजवणे जे भविष्यातील कारकिर्दीसाठी गरजेचे आहे. अशी भावना नगरसेविका वंदना भुते यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मोहन मोहिते, सतीश इखार, मंगेश भोंगाडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिराच्या आयोजन रामनगर शाखाप्रमुख तथा कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय पंच सेन्साई पूजा गोसटकर यांनी केली. प्रस्तावना पालक प्रतिनिधी सौ. हेमाताई राठोड, संचालन राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू सेन्साई पियूष हाबलदार तर आभार सीनिअर खेळाडू सेन्साई शुभम राखडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कार्तिक भगत, आकाश कच्छवाह, ऋषभ चावरे, भार्गव खेवले, देवांशी लाखे, पियूष सिंग, रुझान बांगमोरे व इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.