दौऱ्यात सहभागी विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ इस्रो आणि नासामध्ये दिसतील : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून इस्त्रोची सफर करून परतलेल्या ४४ बाल वैज्ञानिकांचा नागपूर येथील हॉटेल प्राईडमध्ये शाही सत्कार करण्यात आला. आजचे हे विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक आहेत. भविष्यात हेच विद्यार्थी इस्त्रो आणि नासामध्ये संशोधक म्हणून दिसतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.

या सत्कार सोहळा कार्यक्रमास तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, आयआयएम (IIM) नागपूरचे डॉ. शिवाजी धावड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्रा, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे आणि डायट वर्धाचे प्राचार्य डॉ. मंगेश घोघरे तसेच बालवैज्ञानिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *